दिंडोरी प्रतिनिधी :- दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे फाटा येथे दि. ९ मार्च रोजी हॉटेल सुखसागरचे बाजूला हॉटेल जवळ एक बेवारस मृतदेह आढळला आहे
सविस्तर वृत्त असे की नाशिक दिंडोरी रस्त्यावरील पिंपळणारे फाट्याजवळ हॉटेल सुखसागरचे बाजूला सोपान चौरे यांचे हॉटेल जवळ अनोळखी मृतदेह असल्याचे पोलीस पाटील यांनी पोलिसांची संपर्क साधून माहिती दिली अनोळखी मयत पुरुष जातीचा असून अंदाजे वय ५० ते ५५ वर्षे असून त्यास खाजगी ॲम्बुलन्सने ग्रामीण रुग्णालय दिंडोरी येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत असल्याचे घोषित केले
अधिक माहिती आढळल्यास पोलिस हवालदार आवारी यांचे संपर्क साधण्याचे आव्हान दिंडोरी पोलिसांनी केले आहे