महाराष्ट्र ट्रायबल न्युज

तळपत्या उन्हाची लाही शांत केली

प्रतिनिधी शंकर निंबारे देवडोंगरी 
दिनांक १३/३/२०२५
ठाणापाडा येथे होळी सणाच्या निमित्ताने तीन दिवस यात्रा भरवली जाते. या यात्रेत परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उन्हातान्हात गोळा होतात. या बांधवांना विनामूल्य पिण्याचे पाणी वाटप करुन यात्रेकरुंची तहान भागवली. हजारो यात्रेकरूंनी पिण्याच्या पाण्याचा लाभ घेऊन तळपत्या उन्हाची लाही शांत केली. ठाणापाडा येथील राजकीय सामाजिक कार्यकर्ते श्री लक्ष्मण भांगरे व सौ. जयवंताबाई भांगरे या दांपत्याने गेल्या पंचवीस वर्षांपासून दरवर्षी यात्रेकरूंना पिण्याचे पाणी मोफत वाटप करत समाज सेवेची परंपरा कायम जोपासली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने