दिंडोरी: प्रतिनिधी
कादवा कामगार युनियनच्या निवडणुकीत कार्याध्यक्ष भगवान जाधव यांचे नेतृत्वाखालील सत्ताधारी कामगार विकास पॅनल ने सर्व जागा जिंकत आपली सत्ता कायम राखली आहे. तर माजी कार्याध्यक्ष सुनील कावळे यांच्या परिवर्तन पॅनलचा पराभव झाला आहे.
कादवा कामगार युनियनच्या पदाधिकारी निवडीसाठी शांततेत मतदान पार पडत सायंकाळी मतमोजणी झाली त्यात सत्ताधारी कामगार विकास पॅनल चे सर्व उमेदवार विजयी झाले. यानंतर समर्थक कामगारांनी गुलाल उधळत पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला. सत्ताधारी कामगार विकास पॅनलचे विजयी उमेद्वार पुढीलप्रमाणे - भगवान जाधव (कार्याध्यक्ष), अजित दवंगे (सरचिटणीस), कैलास शिंदे, खंडेराव कावळे, संपत भोज (उपाध्यक्ष), कैलास उगले, सुरेश फुगट (सहचिटणीस), संतोष उशिर (खजिनदार), अजय दवंगे, अमोल गटकळ, केशव पवार, कैलास बडदे, बापुराव शिंदे, बाळासाहेब गांगुर्डे, बाळासाहेब दुगजे, शिवाजी गांगोडे, ज्ञानेश्वर पगार (सदस्य) हे निवडून आले होते.नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा कादवा कारखान्याचे चेअर