दिंडोरी तालुक्यातील दहीवी गावात ८ मार्च रोजी हक्क आणि आरोग्य कार्यक्रमांतर्गत गोदरेज फूडस लिमिटेड आणि निर्माण बहुद्देशीय विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच महिला दिनानिमित्त दहवी गावामध्ये महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 96 महिलांनी सहभाग घेतला.
या शिबिरात महासाईसिद्धी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. गौरी पिंगळ, यांनी तपासणी केली. या शिबिरात सामान्य आरोग्य तपासणी किडनी स्टोन, रक्त पातळी तपासणी ,पोटाचे विकार, हात-पायांची सूज, डोळ्यांचे आजार, असे विविध आजारांवर 96 लाभार्थ्यांना मोफत औषधे देण्यात आली. महिलांना मोफत चाचण्या आणि पुढील तपासणीसाठी क्लिनिकचा सल्ला देण्यात आला.
तसेच गावातील सरपंच प्रल्हाद दळवी , उपसरपंच चंद्रकला गांगुर्डे तसेच ग्रामसेवक किशोर गलांडे आणि आशा सेविका मंगल गांगुर्डे एन .एस. पवार , मीरा बागुल अलका शेळके आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी जनार्दन गांगुर्डे यांनी सहकार्य केले. तसेच गोदरेज फुड्स लिमिटेड चे प्रतिनिधी अमोल धात्रक , आरोग्य विभागाचे डॉ. प्रकाश चव्हाण हे कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते
शिबिर यशस्वीतेसाठी निर्माण संस्थेचे प्रतिनिधी सुनीता गावित, राहुल झुरडे, सोनाली पालवी अंकिता लिलके , सुमेधा सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले