महाराष्ट्र ट्रायबल न्युज

सक्तीची वीज वसुली थांबवा अन्यथा आंदोलन करू उपकार्यकारी अभियंता सुनील राऊत यांना शिवसेनेचे निवेदन

दिंडोरी l प्रतिनीधी 
दिंडोरी तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या वतीने सक्तीने वीज वसुली केली जात आहे, ही त्वरित थांबवावी या मागणीचे निवेदन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उपकार्यकारी अभियंता सुनील राऊत यांना देण्यात आले,
 निवेदनात म्हटले आहे की वीज वितरण कंपनीच्या वतीने तालुक्यात घरगुती ग्राहक, व्यावसायिक ग्राहकांनी अनेक दिवसापासून नियमित वीज बिल भरत आलेले आहे, मात्र मार्च एंडिंग मुळे ग्राहकांना इतर आर्थिक व्यवहारांची देवाण-घेवाण करावी लागत आहे, मात्र वीज वितरण कर्मचारी ग्राहकांना कुठली पूर्व सूचना न देता आत्ताच विज बिल भरा अन्यथा वीज कनेक्शन कट करू अशी दमबाजी करून जुलमी वसुली केली जात आहे, ही त्वरित न थांबविल्यास वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला, यावेळी युवासेना संघटक संगम देशमुख, युवासेना तालुकाप्रमुख निलेश शिंदे, शहर प्रमुख संतोष मुरकुटे आदी उपस्थित होते,

दिंडोरी येथे उपकार्यकारी अभियंता सुनील राऊत यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देतांना उपजिल्हाप्रमुख सतीश देशमुख, संगम देशमुख, निलेश शिंदे,

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने