महाराष्ट्र ट्रायबल न्युज

कोऱ्हाटे येथे अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ

मोहाडी : वार्ताहर 
      कोऱ्हाटे येथील मारुती मंदिरात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा वर्षानिमित्त व विक्रम महाराज कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संत निवृत्तीनाथ महाराज भजनी मंडळ व ग्रामस्थांतर्फे  अखंड हरिनाम सप्ताहाला सुरवात झाली आहे. सप्ताह ९ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. सप्ताहात रोज पहाटे काकडा भजन, महापूजा, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण, संत तुकाराम महाराज गाथा भजन, हरिपाठ व रात्री आठ ते दहापर्यंत कीर्तन होणार आहे. रविवारी (ता. ६) सकाळी दहा ते बारादरम्यान विक्रम महाराज कदम यांचे श्रीराम जन्मोत्सवावर कीर्तन, नंतर महाआरती होऊन प्रसाद वाटप होईल. बुधवारी (ता.९) अरुण  महाराज जामटीकर, मुक्ताईनगर यांचे सकाळी नऊला काल्याचे कीर्तन व महाआरतीनंतर महाप्रसाद होईल. 
    या अखंड हरिनाम सप्ताहाचा परिसरातील भावीकांनी लाभ घ्यावा अशी आव्हान भजनी मंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने