महाराष्ट्र ट्रायबल न्युज

वाढत्या उन्हात परीक्षा विद्यार्थ्यांना ठरताय त्रासदायक .


दिंडोरी l प्रतिनिधी - ह्या वर्षी शासन निर्णयानुसार परीक्षा उशिरा सुरू झाल्या आहे ,परंतु सामान्यतः एप्रिल महिन्यात उन्हाची प्रखरता ही तीव्र असते.असे असतानाही पहिली पासून ते ९ वी पर्यंत सर्वच परीक्षा लांबविल्याने विद्यार्थ्यांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. ह्या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र राज्य विद्यार्थी विकास संघटनेचे अध्यक्ष नितीन बोढारे यांनी रोष व्यक्त केला आहे.
तसेच अनेक परिक्षाच्या वेळा देखील दुपारी असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात अशी भीती देखील विद्यार्थी विकास संघटनेकडून व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने