महाराष्ट्र ट्रायबल न्युज

वलखेड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. मंगलाबाई राजगुरु यांची बिनविरोध निवड

वलखेड l नारायण राजगुरू:- वलखेड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी १५ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीत सौ. मंगलाबाई आनंदा राजगुरु यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
       उपसरपंच पदासाठी रोटेशन पद्धतीनुसार निवड होणार असल्यामुळे विद्यमान उपसरपंच रामदास चारोस्कर यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानुसार नियोजित सभेत सौ. मंगलाबाई राजगुरु यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले. ते वैध असल्याचे ठरवून अभ्यासी अधिकारी तथा सरपंच विनायक शिंदे यांनी त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर केली.
     या वेळी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थांनी सौ. राजगुरु यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सरपंच विनायक शिंदे, सदस्य हिरामण पाटील, रामदास चारोस्कर, अश्विनीताई शिंदे, सुमनबाई पाटील, सुनिता राऊत, कमलबाई चारोस्कर, ग्रामसेवक दिगंबर चव्हाण, दिलीप शिंदे, सामाजिक कार्यकर्ते नारायण राजगुरु, रमेश शिरसागर, आनंदा राजगुरु, चिंटू पाटील, विजय राजगुरु, रामभाऊ पाटील, योगेश शिंदे, गणेश शिंदे, रमेश पाटील, वैभव राजगुरु, नारायण शिंदे, विकी राजगुरु, काशिनाथ गायकवाड, रोशन साडे आदी मान्यवर उपस्थित होते.
     ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल सौ. मंगलाबाई राजगुरु यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने