दिंडोरी । मनोज पाटील दि.17:- सन 2025-2030 या कालावधीसाठी नाशिक जिल्हा सहकारी बोर्डाच्या दिंडोरी तालुका संचालकपदी कादवा कारखान्याचे संचालक बाळासाहेब जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नाशिक जिल्हा सहकारी बोर्डाच्या निवडणूकीत दिंडोरी तालुक्यातून संचालकपदासाठी बाळासाहेब जाधव यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाली. बाळासाहेब जाधव हे गेल्या 50 वर्षांपासून सहकार क्षेत्रात प्रभोवीपणे काम करीत असून कादवा कारखाना, शेतकरी सहकारी संघ, दिंडोरी विविध कार्यकारी सोसायटी या सर्व संस्थेवर काम करत संस्थांच्या प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा आहे. जिल्ह्यात सहकारी संहकारी संस्था जिवंत राहायला पाहिजे व शेतकर्यांना त्यांचा फायदा झाला पाहिजे, हे ध्येय बरोबर ठेऊन अत्यंत तळमळीने ते काम करीत आहे. बाळासाहेब जाधव यांच्या निवडीबद्दल अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवाळ, कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, खासदार भास्कर भगरे, माजी आमदार रामदास चारोस्कर, डॉ. सुनील ढिकले, डॉ. संजय पाटील यांच्यासह कादवा कारखाना, दिंडोरी सोसायटीचे सर्व संचालक मंडळ, शेतकरी संहकारी संघाचे सर्व संचालक मंडळंनी अभिनंदन केले आहे.