महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दिंडोरी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

दिंडोरी l प्रतिनिधी :-आजच्या तरुण पिढीने डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेणे गरजेचे असून डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात पोहोचवण्यासाठी व समजून घेण्यासाठी त्यांच्या पुस्तकांचे व विचारांचे वाचन करावे असे आवाहन प्रसिद्ध व्याख्याते समाधान हेडगे पाटील यांनी केले दिंडोरी येथे भीम ज्योत मित्र मंडळांने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी हेडगे पाटील बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच बाळासाहेब मुरकुटे होते, हेडगे पाटील पुढे म्हणाले की डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा विद्वान अभ्यासक झाला नाही अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख झाला असून त्यांचा पुतळा तेथे बसवण्यात आला आहे, त्यांच्या पुतळ्याखाली सिम्बॉल ऑफ नॉलेज असे नाव कोरलेले आहे, इतक्या जागतिक कीर्तीचा महामानव आपल्या भारतात होऊन गेला याचा आपल्याला अभिमान आहे असेही पाटील यांनी सांगितले, याप्रसंगी मान्यवरांनी डॉ, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, याप्रसंगी दिंडोरी नगरपंचायतीच्या वतीने संविधान वाचन करण्यात आले, यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जिवनावर प्रकाश टाकत मनोगत व्यक्त केले, याप्रसंगी नगराध्यक्षा सुनिता लहांगे, उपनगराध्यक्षा माधुरी साळुंखे, कादवाचे संचालक बाळासाहेब जाधव, विश्वासराव देशमुख, सुनील आव्हाड, प्रमोद देशमुख, चंद्रकांत राजे, पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर, माधवराव साळुंखे, कैलास मवाळ, तुषार वाघ, माजी उपनगराध्यक्षा शैला उफाडे, नगरसेवक नितिन गांगुर्डे, सुजित मुरकुटे,प्रदिप घोरपडे, सचिन देशमुख, रमेश बोरस्ते, मनोज ढिकले, रणजित देशमुख, संतोष मुरकुटे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वीतेसाठी भिमज्योत मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले,

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने