दिंडोरी । प्रतिनिधी :- ना. नरहरी झिरवाळ चॅरीटेल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व युवा नेते गोेकूळ झिरवाळ यांच्या संकल्पेतून सोमवार दि. 7 एप्रिल रोेजी सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत दिंडोरी, पेठ, वणी ग्रामीण रुग्णालयात डोळ्यांची तपासणी व मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डोळ्याची तपासणी, मोतिबिंदु शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी दिंडोरी व वणीसाठी राजेंद्र खांडवी, संदीप चौधरी, पिनु मोंढे, संदीप गोतरणे, दिपक पाटील, सुरेश चौधरी तर पेठ तालुक्यासाठी सुयोग गवळी, बाळू गवळी, जितेंद्र जाधव, गणेश गवळी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ना. नरहरी झिरवाळ चॅरीटेल ट्रस्ट व युवा नेते गोेकूळ झिरवाळ मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
सोमवारी मोफत डोळ्यांची तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0