महाराष्ट्र ट्रायबल न्युज

सवलतीच्या दरात साखरेची मुदत 30 एप्रिलपर्यंत

दिंडोरी । मनोज पाटील :-कादवा कारखान्याच्या सर्व पात्र सभासदांना सवलतीच्या दरात दिली जाणारी साखर 30 एप्रिलपूर्वी कारखान्यावरून घेऊन जावी, असे आवाहन कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले आहे. कादवा कारखान्याच्या संचालक मंडळाच्या धोरणानुसार जून 2024 ते एप्रिल 2025 मध्ये पात्र सभासदांना सवलतीच्या दरात साखर वाटपाचा कार्यक्रम कारखाना कार्यस्थळावर राबवला जात आहे. ज्या सभासदांची साखर अद्यापही घ्यावयाची बाकी आहे, त्यांनी 30 एप्रिल 2025 पर्यंत घेऊन जावी. त्यानंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नाही. ज्या सभासदांना अद्याप स्मार्ट कार्ड मिळालेले नाही, अशांनी गट कार्यालयाशी संपर्क साधून आपले स्मार्ट कार्ड न्यावे असे आवाहनही कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने