महाराष्ट्र ट्रायबल न्युज

उज्वल यशाची परंपरा यावर्षीही कायम; ठाणगाव येथील जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाचा निकाल सलग सातव्या वर्षी 100%

बाऱ्हे l नामदेव पाडवी:- सुरगाणा तालुक्यातील जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय ठाणगाव येथील सन - २०२४ - २५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीचा निकाल पुनश्च एकदा १००% टक्के लागला असून विद्यालयाची विद्यार्थिनी 
रोहिणी चंदर पालवी ही ८७ टक्के* गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमाकाने उत्तीर्ण झाली तर कांचन कैलास जाधव ८६ % गुण मिळवून द्वितीय, रोहिणी मधुकर पवार ८५% गुण मिळवून तृतीय, सुनील पुंडलिक जाधव ८३.४०% गुण मिळवून चतुर्थ, पंकज कांतीलाल पाडवी ८३ % गुण मिळवून पाचव्या क्रमांकाचे विद्यालयातून उत्तीर्ण झाले.
      विद्यालयातील एकूण ३९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी सर्वच्या सर्व ३९ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. सलग सातव्या वर्षी विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून
उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे स्नेहबंधन आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ प्रतापगड संस्थेच्या अध्यक्षा कलावती चव्हाण, संचालक समीर चव्हाण, मुख्याध्यापक विवेक निकम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य यांनी अभिनंदन केले आहे तर यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक वामन महाले, संतोष नहिरे, मार्तंड अहिरे, मनोज वैद्य, बाळकृष्ण बोरसे, दिलीप महाले आदींचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने