महाराष्ट्र ट्रायबल न्युज

जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी विद्यालयाची उज्वल परंपरा यशाची कायम

दिंडोरी l वैभव पगार :- आज जाहीर झालेल्या एस. एस.सी. मार्च २०२५ चा जनता इंग्लिश स्कूल दिंडोरीचा निकाल 93.42% टक्के लागला असून विद्यालयातील एकूण ४४१ प्रविष्ट विद्यार्थी होते. त्यापैकी १५१ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असून १४३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर १०० विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत . विद्यालयाचा एकूण शेकडा निकाल - ९३.४२ टक्के इतका लागला आहे . 
        त्यात विद्यालयातील प्रथम क्रमांक कुमारी समृद्धी प्रशांत भोसले ( ९६.००% ), द्वितीय क्रमांक कुमारी आर्या नरेंद्र पगारे (९५.८०% ),तृतीय कुमार राहुल जालिंदर सोंगाळ (९५.६०%) ,चतुर्थ कुमारी विद्या संजय भोजने (९५.२०% ), तर पाचवा क्रमांक विभागून कुमारी स्नेहा शशिकांत मिसाळ ( ९४.६०% ) व कुमारी गौरी अजय जाधव (९४.६०% ) यांनी पटकवला आहे . 
         सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे व पालकांचे मविप्र चे सरचिटणीस आदरणीय ॲड नितीन भाऊ ठाकरे दिंडोरी तालुका संचालक प्रवीण नाना जाधव मविप्र शिक्षणाधिकारी डॉ.भास्कर ढोके माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे तसेच सर्व सदस्य, उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष दत्तात्रय जाधव व सर्व सदस्य अभिनव बाल विकास मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष दौलत दादा उखर्डे तसेच सर्व सदस्य विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद शेजवळ, उपमुख्याध्यापक भरसट यु.डी.,पर्यवेक्षक उशीर आर वाय, दाणी वाय पी ,पगारे व्ही.के. वर्ग शिक्षक श्रीमती गुंजाळ मॅडम, श्रीमती बोरस्ते मॅडम,आहेर ए.एस., श्रीमती पाटील एम.ए., धोंडगे आर.पी., श्रीमती टोंगारे मॅडम, श्रीमती आहेर शितल मॅडम व सर्व विषय शिक्षक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने