बाऱ्हे l नामदेव पाडवी:- माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बाऱ्हे येथील २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील इ. १०वीच्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत संपूर्ण परिसरात विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. यंदाचा निकाल तब्बल 96.55% लागला असून, विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांना आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला यश लाभले आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रमुख उल्लेख:
प्रथम क्रमांक: कु. पालवी जयश्री संपत – 84.20%
द्वितीय क्रमांक: कु. ऋषीकेश रामदास गायकवाड – 82.20%
तृतीय क्रमांक: कु. लता रामदास हिंडे – 81.40%
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या यशस्वीतेमागील शिक्षकांचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती हेमलता बिडकर, उपाध्यक्ष दामु ठाकरे, सचिव मृणाल जोश, प्राचार्या जयश्री पवार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या यशामध्ये पालकांचे योगदान व विद्यालयाच्या शिस्तबद्ध शिक्षणपद्धतीचे महत्वाचे स्थान असल्याचे मतही सर्वांनी व्यक्त केले.
– माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बाऱ्हे