महाराष्ट्र ट्रायबल न्युज

ओझरखेड येथील १०वी चा १०० टक्के निकाल.

देवडोंगरी l शंकर निंबारे  
दि.१४ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ओझरखेड येथील आदिवासी सेवा समिती नाशिक, माध्यमिक आश्रम शाळेचा ५० विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यातील ५० पैकी ५०विद्यार्थी परीक्षेत पास होऊन १००% शाळेचा निकाल लागला. त्यातकांचन संदिप पढेर हिने (७६.४०%) गुण प्राप्त करून आश्रम शाळेत प्रथम क्रमांक मिळविला. तर दिपाली चंदर चौधरी (७६.२०%) गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक, साक्षी रमेश वाढु (७४.२०%) गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावुन यश गाठले आहे. त्यांच्या या यशाबद्दल आदिवासी सेवा समिती नाशिक, संस्था समन्वयक श्री अपुर्वभाऊ हिरे, प्रभारी मुख्याध्यापक गोपाळ राऊत, माध्यमिक शिक्षक सुनील भोये, यशवंत सहारे, विजय लहारे तसेच शाळेचे इतर सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने