महाराष्ट्र ट्रायबल न्युज

मोहाडी देवराईत कृषी मंत्रालय नाशिक केंद्राच्या सहभागाने जागतिक वनस्पती आरोग्य दिन

दिंडोरी l प्रतिनिधी: भारतीय कृषी मंत्रालयाच्या केंद्रीय एकात्मिक किड व्यवस्थापन केंद्र (CIPMC), नाशिक व सह्याद्री देवराई गोपालकृष्ण मोहाडी च्या वतीने जागतिक वनस्पती आरोग्य दिन उद्बोधन व वृक्षारोपणाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी वनस्पतीच्या आरोग्याशी मानवाचे आरोग्य कसे निगडित आहे यासाठी किड व रोग विरहित शेती कशी करावी यावर उद्बोधन पर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रबंधन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी देवराईच्या कार्याविषयी सखोल माहिती घेऊन देवराईतील वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे सातत्य, वृक्षारोपणासंबधी लोकजागृती व लोक सहभाग विषयी देवराईच्या कामाचे कौतुक केले. कार्यक्रमास केंद्रीय एकीकृत नाशिजीव प्रबंधन नाशिक केंद्राचे उपनिर्देशक डॉ. अतुल ठाकरे,वनस्पती संरक्षणाधिकारी डॉ. शरद गायकवाड, सहाय्यक वनस्पती संरक्षण अधिकारी अमित जाधव, ऋषिकेश मानकर, विशाल काशीदे, मविप्र संचालक प्रवीण जाधव यांसह मोहाडी आय टी आय शिक्षक जितेंद्र जाधव व सहकारी तसेच देवराई सदस्य व शेतकरी उपस्थित होते. 
मोहाडी: जागतिक वनस्पती आरोग्य दिनानिमित्ताने देवराईत वृक्षारोपण करताना डॉ.अतुल ठाकरे सहअधिकारी व देवराई सदस्य.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने