महाराष्ट्र ट्रायबल न्युज

सुरगाण्यात गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांसाठी ब्लँकेट व फळ वाटप कार्यक्रम.

सुरगाणा l विजय कानडे:- राज्याचे माजी मंत्री आणि लोकप्रिय नेते गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसाठी ब्लँकेट व फळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून रुग्णांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

  या प्रसंगी उपस्थित डॉक्टर्स व रुग्णांनी गिरीश भाऊ महाजन यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांना "आरोग्यदूत" म्हणून गौरवले.
      या कार्यक्रमाच्या वेळी सुरगाणा नगरपंचायतीचे बांधकाम सभापती तथा नगरसेवक विजय कानडे, प्रकाश भाऊ वळवी, शिंदे गटाचे शहराध्यक्ष राकेश भाऊ बारोट, पवार व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.
     सामाजिक बांधिलकी जपत रुग्णांसाठी घेण्यात आलेला हा उपक्रम समाजात सकारात्मक संदेश देणारा ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने