महाराष्ट्र ट्रायबल न्युज

त्र्यंबकेश्वरला उद्या तिरंगा यात्रेचे आयोजन.


देवडोंगरी l शंकर निंबारे  
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर शहरात तिरंगा यात्रा उत्सव समितीतर्फे दि. १८ रोजी उद्या दुपारी ३ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
    "ऑपरेशन सिंदुर" अंतर्गत आपल्या शुर सैन्य दलाने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे नष्ट करून अनेक आंतकवाद्यांना कंठस्नान घातले. आपल्या भारतीय सैनिकांनी आपल्या राष्ट्रासाठी व राष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी केलेली कारवाई आपल्या सर्वांसाठी गौरवपूर्ण आहे.भारतीय सैनिकांच्या ह्या कार्याच्या सन्मानार्थ श्री.क्षेत्र त्र्यंबकेश्र्वरला तिरंगा यात्रा समितीने या तिरंगा यात्रेचे आयोजन केले आहे. त्र्यंबकवासियांनी ह्या तिरंगा यात्रेत सहभागी व्हावे असे समितीचे संयोजक मिलिंद धारणे, सहसंयोजक विजय महाले आदींनी तिरंगा यात्रेत सहभागी होण्याचे जाहीर आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने