महाराष्ट्र ट्रायबल न्युज

कुंभाळे फाट्यानजीक पुन्हा अपघातात २ मृत्यु व२ गंभीर जखमी

 पेठ l प्रतिनिधी :- 3 दिवसांपूर्वी ज्या जागेवर मोटरसायकल अपघातात २ तरुणांचा मृत्यु झाला होता . त्याच ठिकाणा जवळ पुन्हा दोन मोटरसायकल यांची समोरासमोर धडक होऊन एकाचा मृत्यु तर दोन गंभीर जखमी झाल्याचे प्रकाराने या परिसरात रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्याने खड्डे चुकवितांना अपघात घडून मृत्युचे प्रमाण वाढले आहे . या बाबतचे वृत्त असे की गुजरात मधील वावर ता . कापराडा जि . बलसाड येथील रामदास शिवराम शवरा वय ३८ हा आपली मोटरसायकल क्रमांकGJ15 DL 8122 ने पेठकडे येत असतांना पेठकडून गुजरातकडे जाणारी बिना क्रमांकाची पल्सर गाडी घेऊन हिरामण लक्ष्मण बोरसे वय ४२ याने समोरून येणाऱ्या मोटर सायकलला जोरदार धडक दिल्याने रामदास शवरा व हिरामण बोरसे हे घटनास्थळीच मृत्युमुखी पडले तर या मोटरसायकल वरून प्रवास करणारे नितीन मन्या शवरा व गणेश सोमा गाढवे गंभीर जखमी झाले . या बाबतची अपघाताची शिवराम नानू शवरा याचे फिर्यादी वरुण पेठ पोलीस ठाण्यात अपघाताची नौद करण्यात आली .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने