ओझे l प्रतिनिधी :-तळेगांव दिंडोरी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी सभापती मनोहर दामोदर कथार यांचा 72 वा वाढदिवस आगळावेगळा पद्धतीने साजरा करण्यात आला.
प्रसिद्द चित्रकार डॉ राजीव देशमुख यांनी मनोहर कथार यांचा पेन्सिल स्केच काढला तो आज वाढदिवसाच्या निमित्ताने दिंडोरी माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष भारत खांदवे, कादवा चे माजी संचालक दत्तात्रय जाधव, माजी सैनिक गणपतराव जाधव, निवृत्ती कथार यांच्या हस्ते त्याना देण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष भारत खांदवे यांच्या संकल्पनेतून केकऐवजी फळे कापून वाढदिवस साजरा केला व वाढदिवसानिमित्त सोनचाफा चे झाड देऊन त्याना सन्मानित केले.
यावेळी प्रसिद्द चित्रकार डॉ राजीव देशमुख यांनी काढलेल्या स्केच चे सर्वांनी कौतुक केले.आलेल्या मान्यवरांचे पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष कथार यांनी आभार मानले.