दिंडोरी । मनोज पाटील:- माणुसकी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य 2025 च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने दिला जाणारा समाजभुषण पुरस्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक जिल्हाध्यक्ष सागर गायकवाड यांना प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ. छगनराव भुजबळ व माणुसकी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सागर निकाळे यांच्या प्रदान करण्यात आला.
सागर गायकवाड हे दिंडोरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कर्मवीर दादासाहेब गायकवाड विद्यार्थी वस्तीगृह दिंडोरी चे अध्यक्ष, आंबेदिंडोरी ग्रामपंचायत सदस्य तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे पंतू म्हणून नाशिक जिल्ह्यात परिचित आहेत. गेल्या पंधरा वर्षापासून राजकारणात व समाजकारणात सक्रिय सहभागी असून त्यांच्या कामाची दखल घेऊन सदर पुरस्कार मिळाला आहे. त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्करराव भगरे, कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, रिपाइं उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे, माजी आमदार धनराज महाले, माजी आमदार रामदास चारोस्कर, मविप्र संचालक प्रवीण जाधव, रिपाइं तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, युवक तालुकाध्यक्ष अमोल निकम, सरचिटणीस बाळा गांगुर्डे, मुकूंद गांगुर्डे, प्रवीण गांगुर्डे, रविराज मोरे, बाळा वढाणे, सुनील पांडव, दिनकर भडदिवे आदींनी अभिनंदन केले.