सुरगाणा l कृष्णा पवार:- सुरगाणा शहरात आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या शूर जवानांच्या मनोबलासाठी सुरगाणा शहरात आज भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता सुरू झालेली ही रॅली दुपारी १ वाजेपर्यंत मोठ्या उत्साहात पार पडली.रॅलीत शेकडो नागरिक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, महिला मंडळं, तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हातात तिरंगा धारण करून ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा देशभक्तिपर घोषणांनी संपूर्ण सुरगाणा शहर दुमदुमून गेले.
रॅलीच्या माध्यमातून शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली तसेच सध्या सीमेवर कार्यरत सैनिकांना कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या रॅलीमुळे संपूर्ण शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व आयोजक, सहकार्य करणाऱ्या संस्था आणि नागरिकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी सुरगाणा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष भरत वाघमारे, नगरसेवक सचिन आहेर, बांधकाम सभापती विजय कानडे, राहुल आहेर, अकिल पठाण, एकनाथ भोये आर्दीसह विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.