पेठ तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कातकरीपाडा (करंजखेड) गावातील महिला तसेच ग्रामस्थांना बऱ्याच दिवसापासून पाणी संकटाचा सामना करून दूरवरून पाणी आणावे लागत होते त्याची समस्या लोकनियुक्त सरपंच कमलेश वाघमारे यांनी बघून गुजरात राज्यातील भगवान सत्यसाई परिवाराकडे धाव घेत ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी मागणी केली व त्यांनी बोरवेलची व्यवस्था करून याचा लोकार्पण सोहळा आदिवासी पारंपारिक संबळ वाद्यावर आनंदात गाजत - वाजत पार पडला.
पेठ, सुरगाणा तालुक्यात आजपर्यंत सुमारे शेकडो सत्यसाई परिवाराकडून मोफत बोअरवेल, पिण्याच्या पाण्याची टाकी, स्टार्टर, पाईपलान, मोटर देण्यात आल्या आहेत. सत्यसाई परिवाराकडून मिळालेल्या बोअरवेलमुळे कातकरी पाड्यातील महिलांचा डोक्यावरील हंडा खाली उतरल्याने महिला व ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी पाण्यासाठी घ्यावे लागणारे काबाड कष्ट संपल्याने आया - बहिणींचे आनंदाश्रू बरेच काही सांगून गेले. याप्रसंगी सर्व ग्रामस्थांना स्वादीष्ट भोजन देण्यात आले. प्रत्येक कुटुंबाला पाच फुट उंचीचे भेट कलम आंब्याचे झाड देण्यात आले. लहान मुलांना शालेय उपयोगी वस्तू तसेच प्रत्येक व्यक्तीस टाॕवेल वाटप करण्यात आले. यावेळी भगवान सत्यसाई परिवाराचे हसमुखभाई पांचाल, शैलेशभाई पटेल, रंजनबेन, योगीताबेन, कामीनीबेन, मुख्याध्यापक हिरामण वाडू, सरपंच कमलेश वाघमारे, उपसरपंच संदीप चौधरी, पो.पा. कैलास राऊत, पंढरीनाथ भडांगे, हनुमंत वाघमारे, योगेश गोतुरणे, कमलेश गवे, धनाजी लहरे, लक्ष्मण शेवरे, विष्णू शेवरे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच कमलेश वाघमारे, ग्रामस्थ यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. तसेच गावातील लहान थोर मडळी,ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहायक रमेश चौधरी यांनी केले.
प्रतिक्रिया - यापुर्वी आमच्या कातकरी पाड्यातील महिला, ग्रामस्थ दुसऱ्याच्या खाजगी विहीर, बोरवेलवर पाण्यासाठी दुरवर भटकंती करत होते. आता सत्यसाई परिवाराकडून कातकरीपाडा वासीयांची तहान भागविल्याने सत्यसाई परिवाराचे खूप - खूप आभार
-ः निर्मला मिसाळ, कातकरीपाडा
१) पिण्याच्या पाण्याचे उदघाटन करताना सत्यसाई परिवाराचे हसमुखभाई समवेत सरपंच कमलेश वाघमारे, ग्रामस्थ आदी