महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दिंडोरीत तिरंगा रॅली, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व डॉक्टरांचा सन्मान सोहळा संपन्न

दिंडोरी l मनोज पाटील 
दिंडोरी जनता इंग्लिश स्कूल आणि अखिल भारतीय माजी सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य तिरंगा रॅली, इयत्ता 10वी व 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि डॉक्टर सन्मान समारंभ उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता, सरस्वती मातेच्या प्रतिमा आणि संदुक पूजनाने झाली. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार वसंतराव धुमसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव, पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, सबरजिस्ट्रार संदीप भुसारी, माजी सैनिक संघाचे अध्यक्ष भारत खांदवे, शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे,उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष दत्तात्रय जाधव, शिवाजी भाऊ जाधव, शहीद ढाकणे व शाहिद क्षीरसागर परिवार ज्ञानेश्वर काकड, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राहुल जाधव, दत्तू भेरे, भगवान गायकवाड, रमेश देशमुख, साहेबराव घोलप ,प्राचार्य शरद शेजवळ, पर्यवेक्षक रावसाहेब उशीर, पुरुषोत्तम पगारे,सर्व शालेय समिती सदस्य, अखिल भारतीय माजी सैनिक संघाचे सर्व सदस्य, डीजे फलटण अकॅडमी चे सर्व विद्यार्थी,शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राचार्य शरद शेजवळ यांनी केले. माजी सैनिक संघाचे अध्यक्ष भारत खांदवे यांनी आपल्या मनोगतातून विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
डॉक्टर संदीप गोसावी यांनी लढाख मधील आरोग्य सेवेचा अनुभव कथन केला.
गुणगौरव सोहळ्यात शाळेच्या आणि माजी सैनिक संघाच्या वतीने इयत्ता 10वी व 12वी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
आरोग्य सेवेतील योगदानाबद्दल डॉक्टरांचा गौरव
केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये मोफत आरोग्य शिबिर घेऊन सेवा देणाऱ्या दिंडोरीतील 14 डॉक्टरांचा वृक्ष भेट देऊन सन्मान करण्यात आला.
     1971च्या लढाईत सहभागी असलेले मेजर विजय पिंगळे यांचाही सन्मान करण्यात आला.व 21 महार बटालियन मध्ये कार्यरत असलेले रवींद्र जाधव यांचाही सन्मान करण्यात आला.
‘ऑपरेशन सिंदूर’ च्या यशस्वीतेचा उत्सव यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला. सर्वांच्या गळ्यात तिरंगी घमछा घालून भारतमाता की जय च्या घोषणांनी तिरंगा रॅली काढण्यात आली. मेजर अमर निरगुडे यांनी उंच तिरंगा फडकवत रॅलीचे नेतृत्व केले. मेजर उत्तम बुणगे यांनी जोरदार घोषणा दिल्या.त्यांच्या मागोमाग प्रमुख पाहुणे, डी जे फलटण अकॅडमीचे विद्यार्थी, शिक्षक, माजी सैनिक आणि नागरिक सहभागी झाले होते.
संगीत शिक्षिका श्रीमती देशपांडे मॅडम यांनी इशस्तवन व राष्ट्रगीत सादर केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कथार यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने