महाराष्ट्र ट्रायबल न्युज

ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ बाऱ्हे येथील बाजारपेठेत तिरंगा यात्रा

बाऱ्हे l नामदेव पाडवी :- जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचा गोळीबारात मृत्यू झाला होता. देशात उसळलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संरक्षण दलांनी यशस्वीरित्या पार पाडलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ भाजपा बाऱ्हे,उंबरठाण मंडल अध्यक्ष तथा लोकनियुक्त सरपंच राजेंद्र निकुळे यांच्या नेतृत्वात बाऱ्हे येथे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
       या तिरंगा रॅलीची सुरवात डांग सेवा माध्यमिक विद्यालय बाऱ्हे ते खडकपाडा, बाऱ्हे बाजारपेठ ते ग्रामपंचायत कार्यालय बाऱ्हे पर्यंत काढण्यात आली होती. हिंदुस्थान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.
       या रॅलीत विद्यार्थी, युवक, युवती, महिला भगिनी, सर्व जाती धर्म एकत्र येत, सर्व राजकीय पक्ष संघटना, व्यापारी, पत्रकार, शासकीय, निम शासकीय कर्मचारी उपस्थित होते. तसेच भाजपचे आदिवासी मोर्चा महामंत्री एन डी गावित, माजी उपसभापती कॉ.इंद्रजित गावित, माजी सभापती मंदाकिनी भोये, सुरगाणा मंडल भाजपा अध्यक्ष विठ्ठल गावीत, माजी भाजपा तालुकाध्यक्ष सुनिल भोये, माजी जि.प.सदस्य, युवा नेते देविदास गावीत, मनोज देशमुख, पो.पा. हंसराज खंबाईत, सुरेश वार्डे,भुसारे,मनोहर जाधव, उपसरपंच हर्षवर्धन गावीत, जयराम भोये, हेमराज महाले, मनोज देशमुख, दमयंती चौधरी, चंद्रभागा ठाकरे, भामा जाधव, पार्वती घांगळे, ग्रामीण रुग्णालय बाऱ्हे अधिक्षक डॉ. राजेंद्र बोरसे यांच्यासह बाऱ्हे पोलीस ठाणे अधिकारी - कर्मचारी, महिला - बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने