दिंडोरी । प्रतिनिधी
दिंडोरी शहरात भाजपच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी शिवाजीनगर येथील परिसरात व मंदिरात स्वच्छता अभियान घेण्यात आले. स्वच्छतेचे महत्त्व जनतेला पटवून देण्यात आले. अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याला यानिमित्त उजाळा देण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम दिंडोरी मंडलात व दिंडोरी शहरात झाले. मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. साफसफाई करण्यात आली. शंखनाद करण्यात आला. त्याचबरोबर आरतीही करण्यात आली. यावेळी मंडल अध्यक्ष शामराव मुरकूटे, भाजप दिंडोरी शहराध्यक्ष नितीन गांगुर्डे तसेच महिला तालुकाध्यक्षा उज्वला उगले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संयोजन मित्रानंद जाधव यांनी केले. कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या अमोल महाले व शिवाजी फुगे यांचा सत्कार करण्यात आला. स्वच्छता अभियानात दिंगबर ढाकणे, तुषार घोरपडे, गणेश देशमुख, राम कराटे, अमोल खोंडे, गोविंद बोडके, मदन लोखंडे, प्रकाश माळी, अमर यादव, विजय कापसे, गणेश बुनंगे, निकीता भामरे, आरती पवार, मंदा गायकवाड, भारती देशमुख आदींसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.