महाराष्ट्र ट्रायबल न्युज

कवडासर - वणी खुर्द रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट; नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया, कारवाईची मागणी

कवडासर l प्रतिनिधी :- ननाशी - कवडासर - वणी खुर्द या रस्त्याचे डांबरीकरण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते. मात्र अजून पावसाला नीट सुरुवातही झालेली नसतानाच या रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर उखडणे सुरू झाले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचे स्पष्ट होत असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
    या प्रकारामुळे संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार बेफिकीर आणि जबाबदारीपासून दूर असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात कवडासर गावाच्या नागरिकांनी ठेकेदार आणि खात्याचे अधिकारी यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. केवळ औपचारिकता म्हणून काम केल्याने नागरिकांच्या कररूपी निधीची उधळपट्टी झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
    ही मागणी सरपंच ताराबाई शंकर राऊत, उपसरपंच मधुकर कराटे, माजी सरपंच कृष्णाभाऊ राऊत, छगन भुसारे, चिंतामण कराटे, शंकर राऊत, श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते सुरेशभाऊ गवळी, राजेंद्र चौधरी (रानपाडा), दिपक गायकवाड, शांताराम कराटे, मधुकर पाडवी, जनार्धन शेवरे, पुंडलीक कराटे, माणिक कराटे, नवनाथ राऊत, विलास कराटे, धनराज कराटे आदींनी केली आहे.
     सदर रस्त्याची तातडीने पाहणी करून दर्जेदार काम करण्यात यावे, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर कारवाई न झाल्यास श्रमजीवी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने