महाराष्ट्र ट्रायबल न्युज

ग्रामीण भागात आदिवासी परंपरेला पसंती. मुरंबी येथील राऊत कुटुंबियांनी घरभरणीची जपली आदिम परंपरा

देवडोंगरी l शंकर निंबारे  
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल परिसरातील ग्रामीण भागात आदिवासी समुदायात वडिलोपर्जित हजारो वर्षांपासून चालत आलेल्या आदिम संस्कृती रितीरिवाज परंपरा टिकवण्यासाठी घरभरणी, लग्न सोहळा, वाढदिवस शेत मळणी वगैरे इत्यादी कार्यक्रमात आदिवासी परंपरागत विधीला पसंती देतांना दिसून आली.
   मुरंबी तालुका त्र्यंबकेश्वर येथील देवराम राऊत यांच्या घरभरणी कार्यक्रमानिमित्त त्यांनी आदिवासी परंपरागत घरभरणी विधी नुसार घरभरणी करून आपल्या आदिम परंपरा जपण्यास पसंती दिली. हजारो वर्षांपूर्वी नवीन घरात प्रवेश करतांना ग्रामीण आदिवासी भागात ज्या पद्धतीने गृह प्रवेश विधी केला जातो जसे की, आपल्या कुटुंबाचे कुलदैवत (बांबूपासुन बनविलेली करडीतील दैवत) सुपात घेऊन तारपा वाद्यांच्या गजरात दगडी दिव्याच्या ओवाळणी वापरून नवीन घराला प्रदक्षिणा घालून घरात आंब्याची पाने, कलस, झेंडुची फुले, धनधान्याच्या राशीवर कुलदैवताची मांडणी करून आदिवासी परंपरागत रितीरिवाज नुसार विधी करून घरभरणी (गृहप्रवेश) केला जातो. या पध्दतीने आदिवासी भगत आप तुकाराम चौधरी (लेखक), समवेत आप वसंत राऊत सर, आप कृष्णा राऊत सर (कवी) यांच्या सहकार्याने मुरंबी येथील राऊत कुटुंबीयांची आदिम परंपरागत पद्धतीने घर भरणी कार्यक्रम पार पाडला.
प्रतिक्रिया :- 
    आमच्या गावातील देवराम राऊत यांनी खरोखरच कौतुकास्पद कार्य केले. आपल्या आदिम, पारंपरिक पद्धतीने घरभरणी (गृहप्रवेश) केली. अशा समाज परिवर्तन करणाऱ्या माणसांचे आदिवासी बचाव अभियान महाराष्ट्र राज्य स्वागत करीत आहे व त्यांचे पुढील सुखमय आयुष्यासाठी महादेवाकडे व कणसरा मातेकडे आळवणी करीत आहे.
     - आप वसंत राऊत, मुरंबी

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने