महाराष्ट्र ट्रायबल न्युज

जागतिक मासिक पाळी व स्वच्छता दिनानिमित्त हरसूल येथे जनजागृती कार्यक्रम संपन्न

त्र्यंबकेश्वर l प्रतिनिधी दि 28:-जागतिक मासिक पाळी व स्वच्छता दिनानिमित्त राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम त्रंबकेश्वर, हरसूल व निर्णय फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामपंचायत हरसूल येथे किशोरवईन मुली व महिला यांना मासिक पाळी व व्यवस्थापन या विषयी सविस्तर असे मार्गदर्शन करण्यात आले, याप्रसंगी एकूण किशोर वईन मुली व महिला असे एकूण 255 कापडी पॅड चे निर्णय फॉउंडेशन मार्फत वाटप करण्यात आले.
       या कार्यक्रमाला उपस्थित हरसूल ग्रामपंचायत महिला, किशोरवईन मुली, तसेच (निर्णय फॉउंडेशन) चे श्रीमती संगिता बळोदे मॅम,RKSK समुपदेशक श्री. रविंद्र गांगोडे (उपजिल्हा रुग्णालय त्रंबकेश्वर), व RKSK समुपदेशक श्री. मोगल कासीम (ग्रामीण रुग्णालय हरसूल ) इत्यादी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने