महाराष्ट्र ट्रायबल न्युज

युवकांनी दिले पारव पक्षाला जीवदान

दिंडोरी । वैभव पगार :- दिंडोरी येथील दैनिक देशदूत विभागीय कार्यालयासमोर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास काही कावळ्यांनी चोच मारून पारव या पक्षाला जखमी केल्याचे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार मनोज पाटील यांच्या निदर्शनास आले. मनोज पाटील यांनी जखमी अवस्थेच्या असलेल्या पारव या पक्षाला पाणी पाजून एका सुरक्षित ठिकाणी ठेवले. यावेळी त्यांनी वन अधिकार्‍यांची संपर्क साधला असता वनविभागाचे वन मजूर शांताराम शिरसाट हे घटनास्थळी दाखल झाले. त्या जखमी पारवाला या तरुणांनी त्यांच्या स्वाधीन केले. यावेळी शिरसाट यांनी सांगितले की, आता हे पाराव सुरक्षित जागेवर आहे. त्यानंतर त्यांनी त्या पारवला गच्चीवर नेवून आकाशात सोडण्यात आले. यावेळी पत्रकार मनोज पाटील, ऋषिकेश खांदवे, तेजस पवार, महेश पाटील, आनंदा निखाडे यांचे वन विभागाकडून कौतुक करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने