दिंडोरी । प्रतिनिधी:-पत्ता विचारणार्या मोटारसायकलस्वारास लिप्ट मागीतल्याचा राग आल्याने दोन संशयितांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याने सदर युवक गंभीर जखमी झाला आहे. संदिप काळु रेहरे (30), रा. निगडोळ, ता. दिंडोरी हा युवक उमराळे - हातनोरे या रस्त्यावरुन जांबुटके येथून निगडोळ येथे जात असताना त्याच्या मागाहुन एक मोटारसायकल आली. त्यावर दोन अनोळखी इसम होते. त्यांनी हातनोरेकडे जाणारा रस्ता हाच का, असे संदीप यास विचारले. तेव्हा हाच रस्ता, असे त्याने उत्तर दिले. दरम्यान, मलासुद्धा तुमच्या दुचाकीवर येऊ द्या, असे संदीप म्हणाला. याचा राग या दोघांना आल्याने जास्त शहाणा आहे का? असे म्हणुन मोटारसायकलवरुन उतरुन संदिपला मारहाण करु लागले. यास प्रतिकार करताच एका संशयिताने चाकूने संदिपवर हल्ला करुन त्यास गंभीर जखमी करत ते घटनास्थळावरुन फरार झाले. गंभीर अवस्थेत असलेल्या संदिपला प्राथमिक उपचारानंतर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. चौकशी दरम्यान संदिपच्या जबाबावरुन दोन अनोळखी हल्लेखोर व गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीचा शोध दिंडोरी पोलिस घेत असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लिप्ट मागीतल्याने युवकावर हल्ला
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0