उत्तुंगतेज फाउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या बालवैज्ञानिक स्पर्धेत पिंपळगाव येथील दिल्ली पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी संस्कृती संतोष जमधडे हिने यश मिळविले असून तिची मोफत इस्रो सहलीसाठी निवड झाली आहे. याबद्दल तिचे विविध स्थरातून अभिनंदन होत आहे.
उत्तुंगतेज फाउंडेशन गेल्या पाच वर्ष्यापासून ग्रामीण तसेच शहरी भागात शैक्षणिक , सामाजिक व विज्ञान क्षेत्रात कार्य करीत आहे. बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेद्वारे दरवर्षी महाराष्ट्रातील पन्नास हुन अधिक विद्यार्थ्यांना मोफत भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) ,आयआयटी ,आयआयएम या उच्च संस्थाना विनामूल्य सहल आयोजित केले जाते .त्यात संस्कृती ची निवड झाली आहे.