महाराष्ट्र ट्रायबल न्युज

सागवान वृक्षाची चोरी


पेठ । प्रतिनिधी:-
पेठ तालुक्यातील दाभाडी परिसरात जयराम महादू पवार यांच्या मालकीच्या गट क्र. 11 मध्ये रात्रीतून सागवान वृक्षाची कत्तल करुन नेल्याची तक्रार पुष्पराज पवार यांनी पेठ पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पेठ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सागवान वृक्षांची कत्तल करुन चोरी करण्यात येत आहे. याबाबत वनविभागानेही स्थळ पंचनामा केला असला तरीही वनसंपत्तीची तस्करांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असल्याने मुळात नष्ट होत चाललेली वनसंपदा वाचविण्याचे आव्हान वनविभागापुढे असतांना कुठलाही ठोस कार्यक्रम राबविला जात नसल्याने वन तस्करांना कुठलाही धाक राहीलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने