maharashtratribalnews

सुरगाणा तालुक्यात अवकाळी पाऊसामुळे शेतकरी राजाचे चाऱ्याचे मोठे नुकसान

सुरगाणा l कृष्णा पवार:- सुरगाणा तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने थैमान घातले असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः शेतकरी राजा यांच्या जनावरांसाठी साठवलेला चारा पूर्णपणे भिजून खराब झाला आहे.
    शेतकरी राजाने हंगामासाठी मेहनतीने चारा साठवून ठेवला होता. परंतु अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे तो चारा भिजून नष्ट झाला. "सगळं स्वप्न उध्वस्त झालं. जनावरांसाठी साठवलेला चारा जपून ठेवला होता, पण पावसामुळे सर्व वाया गेलं," असे सांगताना शेतकरी राजा यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.
   या संकटामुळे आता जनावरांना चारा कसा द्यायचा, हा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली असून, नुकसानीचा सर्वे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जावी, अशी मागणी करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने