सुरगाणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने तालुकाध्यक्ष राजेंद्र (राजुदादा) पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कुठलाही राजकीय वारसा नसलेल्या सर्व सामान्य कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला मोठा संख्येने जनसमुदाय होता. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी राजु दादा पवार यांना शुभेच्छांचा वर्षाव केला. याच कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्रीताई पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार, डॉ.सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी, युवा नेते ऋषिकेश पवार, सुरगाणा नगरपंचायत नगरसेवक विजय कानडे, शिवसेना तालुका प्रमुख हरिभाऊ भोये, माजी जि.प.सदस्य गोपाळ धूम, जनार्धन भोये, सुरगाणा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष भरत आप्पा वाघमारे यांनी विशेष सत्कार करण्यात आला. तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बनपाडा येथे कांदाशेड येथे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. राजु पवार यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उत्स्फूर्तपणे आपला आनंद व्यक्त केला.
या सोहळ्यादरम्यान राजु पाटील, सोमनाथ सोनवणे, अनिल घोडेश्वर, मनोज वेडणे, खुशाल सोनजे, संदीप वाघ,योगेश ठाकरे, युवराज लोखंडे, भास्कर आलबाड, मनोज देशमुख, मनोज सेजोळे, सरपंच नामदेव भोये, उपसरपंच विजय देशमुख, विजय दळवी, सरपंच योगेश ठाकरे, भागवत गवळी, दिनेश चौधरी,सुरेश थवील, नामदेव पाडवी,निलेश करवंदे,शिंदे सरपंच पुंडलिक पवार, चदर भोये, जयराम गायकवाड,चंदर राऊत, काशिनाथ गावीत,सुनील गोतुरणे, सुनिल गवळी, सखाराम सहारे,अनिल बागुल, यशवंत चव्हाण, परसराम कामडी दादाजी चव्हाण, अशोक गवळी, काशिनाथ वाघमारे पुंडलिक खांबाईत, राजु पवार, चिंतामण वार्डे, भास्कर पवार, एकनाथ पवार, जोपळे सर, कृष्णा भोये, अंबादास खांडवी, कांतीलाल खांडवी, शाम पवार, प्रकाश धूम, सागर चौधरी, देशमुख साहेब, सचिन कड, राकेश दळवी, राजु गवळी यांच्यासह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.