ओझे । प्रतिनिधी :- दिंडोरी वीज केंद्रात वीजतंत्री कर्मचार्याला शॉक लागून खांबावरुन पडल्याने जखमी झाला आहे. वीज ऑपरेटरच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप इतर विजतंत्र्यांनी केला आहे. वलखेड फिटर हे बंद असल्यामुळे दिनकर बागुल हे कक्ष अभियंता महेश पवार तसेच ऑपरेटर पूजा महाले यांच्या उपस्थितीत खांबावर चढले. अधिकार्यांनी वीज पुरवठा बंद असल्याचे सांगितल्याने दिनकर बागूल हे खांबावर चढले व तत्काळ त्यांना शॉक बसला. शॉक बसताच ते खांबंावरुन खाली पडल्याने गंभीर झाले. त्यांना तातडीने नाशिक येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, सर्व कर्मचार्यांनी संबंधित ऑपरेटर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. परंतू उपकार्यकारी अभियंता राऊत व सहाय्यक अभियंता टिकस यांनी कर्मचार्यांची समजूत काढली. त्याचबरोबर पुर्वीही कर्मचारी संघटनेने संबंधित ऑपरेटरबाबत तक्रार केली होती. आता दिनकर बागूल यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरु असुन प्रकृती गंभीर आहे.
शॉक लागून वीजतंत्री जखमी
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0