त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल पोलिस ठाणे हद्दीत सराईत वाहन चालक (नाव: अज्ञात) ह्युंदाई कंपनीची क्रेटा गाडीत (क्र. जीजे १९ बीजे १००१) मुद्दे माल किंमत १२,७४,२५०/- रुपये किंमतीचा (गाडीसह) आपल्या कब्जात बाळगून भरधाव वेगाने पोलिसांना हुलकावणी देत हाथलोंढी या गावात मुद्दे माल सोडून आरोपी फरार झाला.
हरसुल पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारू वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर पोलीसांची करडी नजर आहे. दि.२४ रोजी पोलिसांना अवैध दारू वाहतूक होणार असल्याची खबर मिळाली. हरसुल पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी चेतन लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली पोउपनि. मोहीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहकार्यांनी संशयितांच्या मुसक्या आवळण्यासाठी सापळा रचला. अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाने भरधाव वेगाने वाहन (क्र. जीजे १९ बीजे १००१) चालवून पोलिसांना चुकवीत हुलकावणी देत मुद्दे माल लपवण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न हातलोंढी गावात येऊन फसला. अखेर संशयित आरोपीने आपल्या कब्जात तरतूद केलेला मुद्दे माल सोडून आरोपी फरार झाला.
मिळालेला जप्त मालः
१) २५,५००रु. किंमतीचा रॉयल्स चॅलेन्जर्स नावाचे लेबल असलेल्या १८० मिली मापाच्या ३०० सिलबंद बाटल्या प्रत्येकी ८५/-रु प्रमाणे, २) २२५००रु. किंमतीच्या रॉयल स्पेशल प्रिमीयम व्हिस्की नावाचे लेबल असलेल्या १८० मिली मापाच्या ४५० सिलबंद बाटल्या प्रत्येकी ५० रु प्रमाणे,
३) २६२५० रु. किंमतीच्या डी.एस.पी. ब्लॅक नावाचे लेबल असलेल्या १८० मिली मापाच्या ३५० सिलबंद बाटल्याप्रत्येकी ७५ रु. प्रमाणे,
४) १२,००,०००रु. एक काळ्या रंगाची ह्युंदाई कंपनीची क्रेटा कार तिचा रजिस्टर नंबर (GJ 19 BJ 1001) असा असलेली जु.वा.किं.अं. एकुण १२,७४२५० रू. किमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे.
हरसुल पोलीस ठाणे प्रोव्हीश गु.र.नं. महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम, भारतीय न्यायसंहीता कलम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास हरसुल पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेड पोउनि श्री प्रताप जाधव, पोउपनि. मोहीत मोरे, पो.हो. देवदत्त गाडर, पो.शि. विलास जाधव, मोहित सोनवणे, रवीकिरण पवार, युवराज चौहान, योगेश गायकवाड तपास करीत आहेत.