सुरगाणा l प्रतिनिधी दि.28:-रामचंद्र हॉस्पिटल, धरमपूर यांच्या सहकार्याने सुरगाणा तालुक्यातील सुरगाणा शहर, देवलदरी व भदर या गावांमध्ये भव्य नेत्र तपासणी व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. नेत्र तपासणीदरम्यान ज्या नागरिकांना चष्म्याची आवश्यकता भासली, त्यांना मोफत चष्मे देण्यात आले. शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
शिबिराचे उद्घाटन सुरगाणा शहरातील प्रख्यात व्यापारी राजेंद्र कानडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थितीमध्ये निबा शेठ बागुल, नितेश सूर्यवंशी, मयूर सूर्यवंशी, विनायक जंगम, रवि वाघ, छोटू काका आहेर यांचा समावेश होता.
शिबिराचे आयोजन नगरसेवक रमेश दादा थोरात मित्र परिवार व नगरसेवक विजय कानडे यांच्या संयुक्त पुढाकाराने करण्यात आले होते.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे प्राथमिक आरोग्य तपासणीसंदर्भातील प्रश्न सुटले असून, आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.