नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील पाच
गावातील आदिवासी समाजातील पारंपरिक वारसा लोककला,खाद्य संस्कृती,लोक नृत्य कौशल्यावर आधारित नृत्य प्रदर्शन करणाऱ्या समूहासाठी क्षमतेच्या विकासाची कार्यशाळेचे आयोजन १४ मे ते ३१ मे २०२५ अखेर श्रीभुवन बर्डा, चिंचपाडा, वांगण या ठिकाणी नृत्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.तर पिंपळसोंड येथे बोहाडा मुखवटे निर्मात्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
१ ते ६ जून या दरम्यान आदिवासी समाजातील खाद्य संस्कृतीवर आधारित पारंपरिक पद्धतीने तयार केले जाणारे खाद्य पदार्थ पाककृती कार्यशाळा आयोजित करण्यात आले आहे.या पाचही गावात सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत कार्यशाळेचे आयोजन
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC)नाशिक व काँटॅक्ट बेस संस्था पश्चिम बंगाल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
यामध्ये कौशल्य विकसित करण्याचे प्रशिक्षण दिले जाते आहे. अमूर्त सांस्कृतिक वारसावर (ICH) आधारित पर्यटनाला चालना देण्यासाठी एक अभिनव व नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. सदर उपक्रमाकरिता एमटीडीसीने "कॉन्टक्ट बेस" या संस्थेला समुदाय आधारित पर्यटन मॉडेल डिझाइन आणि विकसित करण्यासाठी नियुक्त केलेले आहे. बंगाल नाटक डॉट कॉम हि संस्था ' सांस्कृतिक विकास आणि सर्वसमावेशक पर्यटन' या विषयावरील तज्ञांमार्फत सामाजिक उपक्रम राबवित असते. या उपक्रमाच्या माध्यमातून शाश्वत ग्रामीण आर्थिक विकासाला चालना देऊन पर्यटन प्रोत्साहन तसेच क्षमता निर्माण करून देशाचा सांस्कृतिक वारसाचे जतन व संवर्धन करण्यावर भर दिला जाणार आहे. सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड, डोल्हारे, श्रीभुवन बर्डा, चिंचपाडा या
गावात आदिवासी समाज सांस्कृतिक वारसा पिढ्यानपिढ्या समाजाची ओळख प्रतिबिंबित करणाऱ्या लोक परंपरा,प्रथा जतन करीत असून अशा सांस्कृतिक वारसांना चालना देण्यासाठी एका
गावांमध्ये फेस्टिवलचे आयोजन करण्यात येणार आहे.यामध्ये सांस्कृतिक वारसा मध्ये मौखिक पारंपरिक लोक गीते, लोककथा,दंतकथा,लग्न गीते परफॉर्मिंग आर्टस, सण, उत्सव विधी,खेळ, हस्तकला,निसर्ग आणि वारसा हक्कांने चालत आलेले वनौषधींचें पारंपारिक ज्ञान यांचा समावेश करण्यात आला आहे.
तसेच या कार्यशाळेत चित्रकार, मुखवटे, बांबू टोपली बनवणारे, शोभिवंत वस्तू तयार करणारे, पारंपरिक खाद्यपदार्थ,लोकनृत्य काबंड नृत्य , ठाकर नृत्य सादर केले जाणार आहे. यार कार्यशाळेत बंगलोर येथील तज्ञ मार्गदर्शक र सुमन दास,संतू गुचाइत,गौतम सेन,राहुल नंदी,अरींदम दोळई, नंदलाल महातो हे सहभागी झाले आहेत.
फोटो- श्रीभुवन बर्डा येथे नृत्य कलेचे मार्गदर्शन करतांना बंगलोर येथील गौतम सेन.