maharashtratribalnews

धान घोटाळ्यात अधिकार्यांचा सहभाग. महामंडळाचे संचालक धनराज महालेंचा आरोप

दिंडोरी l मनोज पाटील आदिवासी विकास महामंडळाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला धान (भात) हा गुजरात ला विकल्याच्या प्रकारची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी महामंडळाचे संचालक माजी आमदार धनराज महाले यांनी केली आहे. या प्रकारात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची मिलिभगत असल्याचा आरोपही महाले यांनी केला आहे.
माजी आमदार धनराज महाले यांनी याबाबत सांगितले आहे कि सुरगाणा तालुक्यात उघडकीस आलेला प्रकार हा अत्यंत गंभीर असून भात गुजरात मधील मिल मध्ये जात असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले आहे. चांगल्या दर्जाचा तांदूळ च्या बदल्यात खराब कमी प्रतीचा तांदूळ बदली केला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे तरी 
या प्रकारची सखोल चौकशी करण्याची मागणी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, अन्न व औषधं प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांचेकडे करण्यात आली आहे. एकीकडे व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड या आदिवासी विकास महामंडळ व आदिवासी विकास साठी चांगले काम करत असताना इतर अधिकारी चुकीचे कामे करत खेळखंडोबा करत आहे.प्रादेशिक व्यवस्थापक, प्रादेशिक उप व्यवस्थापक आदि काही अधिकारी कर्मचारी हे संघनमताने मनमानी करत असून या प्रकारात यांचीच मिलिभगत असल्याचा आरोप महाले यांनी केला आहे.बोगस भरती प्रक्रियेतील अधिकारी आदिवासी बांधवाच्या निधीवर डल्ला मारीत असल्याने आदिवासी लोकप्रतिनिधी मध्ये तीव्र संतापाची भावना आहे
या प्रकारची सखोल चौकशी होत दोषीवर कारवाई होण्याची गरज आहे असाच प्रकार अन्य कुठे झाला असल्याची शक्यता असून त्याचीही चौकशी करण्यात यावी. विविध अधिकारी कर्मचारी गेली अनेक वर्ष एकच जागेवर नियुक्त असून त्यातील काही अधिकारी कर्मचारी हे मनमानी कारभार करत असून त्यांच्याही तात्काळ बदल्या कराव्यात अशीही मागणी माजी आमदार धनराज महाले यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने