वणी । प्रतिनिधी :-किरकोळ स्वरुपाच्या वादातुन भावाने भावाचा चाकुने खुन केल्याने एकच खळबळ उडाली असुन संशयीतास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. म्हेळूस्के ता. दिंडोरी येथील हरी दत्तु बरडे व शरद दत्तु बर्डे यांच्यात अंतर्गत वाद झाला व रागाच्या भरात हरी दत्तु बर्डे रा.म्हेळुस्के याने त्याचा भाऊ शरद दत्तु बर्डे यास घडलेल्या वादातुन शिविगाळ केली. हरी याने शरदच्या छातीवर व मांडीवर चाकुने वार केले. त्यात ते गंभीर जखामी झाले. शरदला वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तपासणी अंती शरद याचा मृत्यु झाला. दि. 22 मे रोजी रात्री नऊ वाजुन तीस मिनीटाचे सुमारास ही घटना घडली. वणी पोलिसांना ही माहीती मिळताच सपोनी सुनिल पाटील व पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली व संशयीतास ताब्यात घेतले. याबाबत वणी पोलिस ठाणयात 103(1),352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक गणेश कुटे करीत आहे.
किरकोळ वादातुन भावाने भावाचा खुन
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0