महाराष्ट्र ट्रायबल न्युज

शासकीय आश्रम शाळा ठाणापाडा येथील १०वी चा ९७.१० टक्के निकाल.

देवडोंगरी l शंकर निंबारे 
दि.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा ठाणापाडा येथील शाळेचे ७० विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यातील ६७ विद्यार्थी परीक्षेत पास होऊन ९७.१०% शाळेचा निकाल लागला. त्यात राज्यस्तरीय खो खो सुवर्ण पदक विजेता खेळाडू रुपेश दिलीप पवार याने (८०.६०%) गुण प्राप्त करून आश्रम शाळेत प्रथम क्रमांक मिळविला. तर निकिता पोपट शिंदे हिने (८०.४०%) गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक, कावेरी रमेश बोरसे (७९.४०%) गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक, किर्ती वसंत बोरसे (७९%) गुण प्राप्त करून चतुर्थ क्रमांक, रायचन परशराम बलख (७८.६०%) गुण प्राप्त करून पाचवा क्रमांक पटकावुन यश गाठले आहे. त्यांच्या यशाबद्दल मा.अर्पित चौहान साहेब (भा.प्र.से.) सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक, श्री. नामदेव भांगरे साहेब (शिक्षण विस्तार अधिकारी) शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुरेंद्र शेंडे, श्री.अशोक चौरे (माजी मुख्यध्यापक), शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीम.वनिता भगवान भोये, उपाध्यक्ष श्री.संतोष शिवराम बोचल, अधीक्षक श्री. विष्णुकांत हिंगडे, अधीक्षिका श्रीम.जया बिऱ्हाडे, वर्गशिक्षिका श्रीम.भारती पेहरे श्री.रमण ठाकरे, श्री.देवराम किलबिले श्री. प्रियांक दाभाडे,श्री.काळू भसरे, श्रीम.ज्योती वाघचौरे, श्री.ज्ञानेश्वर क्षीरसागर श्री.कमलाकर चौधरी, श्रीम.कविता लहारे,श्री.हिरामण झिरवाळ, श्री.गोपाळ वंजारे,श्री.संजय भोये, श्री.हेमंत साबळे व इतर सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने