maharashtratribalnews

लाक्षणिक अन्नत्याग उपोषणास पाठिंबा

दिंडोरी । मनोज पाटील :- जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचलित दिव्यांग सेवा समिती, महाराष्ट्र यांच्या वतीने दिंडोरी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक अन्नत्याग उपोषण आंदोलन करण्यात आले आहे.
    जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचलित दिव्यांग सेवा समितीचे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे दिव्यांग बांधवांना 6000 रु. पेन्शन मिळावी, शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावी व कष्टकरी, कामगार, महिला व अन्य वंचित घटकांच्या न्यायहक्कासाठी गुरुकुंज मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. परंतु शासनाने रास्त मागण्याबाबत अद्यापपर्यंत कुठलीही दखल न घेतल्याने जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचलित दिव्यांग सेवा समिती, महाराष्ट्र राज्याच्यावतीने पूर्ण पाठिंबा दर्शविण्यासाठी व आंदोलनाला बळ देण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिंडोरी येथील तहसील कार्यालय समोर एक दिवशीय लक्षणीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले आहे. सदर आंदोलनाची प्रशासनाने नोंद घेवून न्याय मिळावा अन्यथा जनकल्याण दिव्यांग सेवा समितीच्या वतीने दिंडोरी तालूका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असा इशारा आंदोलनकर्ते सुकदेव खुर्दळ यांनी दिला. यावेळी जनकल्याण मराठी संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जाधव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष रफीक सय्यद, राज्य अध्यक्ष देवीदास बैरागी, प्रहार तालूकाध्यक्ष जयंवत थेटे, विलास कदम, एकनाथ लोंखडे, चंद्रभान बोरस्ते आदींसह अन्याय अत्याचार निवारण समिती, पोलिस मित्र, पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने