maharashtratribalnews

ग्रामीण रुग्णालयाला संगणक, पिंटर भेट

दिंडोरी । मनोज पाटील:- 
अन्न व औषध प्रशसनमंत्री ना. नरहरी झिरवाळ यांच्या स्थानिक विकास निधीतून दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाला संगणक व प्रिंटर भेट देण्यात आले आहे. 
      ग्रामीण रुग्णालयाला अनेक दिवसांपासून संगणक व प्रिंंटरची आवश्यकता होती. याबाबत येथील अधिकार्‍यांनी युवा नेते गोकूळ झिरवाळ व पदाधिकार्‍यांकडे संगणक व प्रिंंटरची मागणी केली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशसनमंत्री ना. नरहरी झिरवाळ यांच्या स्थानिक विकास निधीतून संगणक व प्रिंटर भेट देण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेमंत घंगाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर काळे, सहाय्यक अधीक्षक चौधरी, ठघडघ समुपदेशक रीना शांताराम चारभे, खउढउ समुपदेशक सुरेखा पांगरे, डॉ. भुजबळ, सारंग मोहिले, शांताराम चिखले, रायुकॉ तालुकाध्यक्ष कृष्णा मातेरे, हिरामण गावित, विक्रम मवाळ, प्रतिक जाधव, परिक्षित देशमुख, मंगेश घोलप आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने