दिंडोरी l मनोज पाटील:- दिंडोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात काँक्रिटीकरणांचे रस्ते झाले आहेत ते सर्व अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे अपघात होत आहे. त्यामुळे त्वरीत यावर उपायोजना करण्यात याव्या, अशी मागणी माजी आमदार धनराज महाले यांनी केली आहे.
काँक्रीटीकरण रस्त्यांची उंची फार झालेली आहे. त्यामुळे साईड पट्टेच भरलेले नाहीत. त्या रस्त्यांची रुंदीकरण फार कमी आहे. त्यामुळे दोन वाहने पास होत नाही. हे रस्त्यांच्या रुंदीकरणाचा जो काही रेशो आहे व तो कशा पद्धतीने आहे हेच कळत नाही. जर दोन फोर व्हीलर वाहने पास होत नसतील तर हा रस्ता किती मीटरचा आहे आणि किती लांबीचा आहे याची माहिती सादर करावी. त्याचबरोबर दोन्ही रस्त्यांच्या साईट पट्ट्या भरल्या गेलेल्या नाहीत आणि भरल्याही तरी त्या पक्क्या होत नाही. अन्न व औषध प्रशासनमंत्री ना. नरहरी झिरवाळ यांनी याबाबत तात्काळ बैठक आयोजित करावी व त्यावर काय उपाययोजना कराव्यात याबाबत आदेश द्यावे, अशी मागणी माजी आमदार धनराज महाले यांनी केली आहे.