महाराष्ट्र ट्रायबल न्युज

निळवंडीत मंगळवारपासून हरिनाम सप्ताह

निळवंडी । प्रतिनिधी:-निळवंडी येथे श्री हनुमान मंदिर जिर्णोद्धार वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह मंगळवार दि. 10 रोजी ते मंगळवार दि. 17 जून 2025 रोजी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. 
     या सप्ताह काळात विना पूजन, कलश पूजन, टाळमृदंग, संत पूजन, ज्ञानेश्‍वरी पूजन, काकडा, हरिपाठ त्याचबरोबर पहाटे 4 ते 6 वा. काकडा, सकाळी 10 ते 12 वा. गाथा भजन, सायंकाळी 5 ते 6 वा. हरिपाठ, रात्री 8.30 ते 10.30 वा. हरिकिर्तन आदी कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दि. 10 रोजी निवृत्ती महाराज (नांदुर्डीकर), बुधवार दि. 11 रोजी निलीमाताई गांगुर्डे (कोटमगांव), गुरुवार दि. 12 रोजी ज्ञानेश्‍वरी माऊली सुरोसे (चाळीसगांव), शुक्रवार दि. 13 रोजी उमेश महाराज दशरथे (आळंदीकर), शनिवार दि. 14 रोजी कृष्णा महाराज कमानकर (भेंडाळी), रविवार दि. 15 अरुण महाराज जामठीकर, सोमवार दि. 16 रोजी कबीर महाराज अत्तार (कोेल्हापूर), त्याचदिवशी दुपारी 4 वाजता दिंडी, प्रदक्षिणा सोहळा होणार आहे. मंगळवार दि. 17 रोजी आण्णा महाराज चव्हाण (वनारवाडी) यांचे सकाळी 9 ते 11 वाजता काल्याचे किर्तन होणार आहे. ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद देवून सप्ताहाची सांगता होणार आहे. गायनचार्य म्हणून प्रकाश महाराज सुरोशे, मिलींद महाराज, मृदुंगाचार्य म्हणून माऊली महाराज नाठे, सार्थक पाटील, अक्षय पाटील, हार्मोनियम म्हणून अमोल पाटील, चोपदार म्हणून चिंधु मेधणे, विश्‍वनाथ महाराज यांची साथ लाभणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहासाठी महालक्ष्मी इ. एस. एस. सर्व्हिसेस, निळवंडी, जे. पी. कृषी उद्योग निळवंडी, सुनंदा दुध संकलन दिंडोरी, मे. कृषी दौलत दिंडोरी, जय योगेश्‍वर कृषी सेवा केंद्र दिंडोरी, जय भवानी डेअरी अ‍ॅण्ड बीडींग फार्म निळवंडी यांचे सहकार्य लाभणार आहे. तरी या अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री हनुमान मंदिर देखभाल समिती, भजनी मंडळ, स्वाध्याय परिवार, जय बाबाजी भक्त गण, सर्व बचत गट, ग्रामस्थांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने