महाराष्ट्र ट्रायबल न्युज

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

देवडोंगरी l शंकर निंबारे :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) दादासाहेब फाळके त्रंबकेश्वर, अंजीनेरी ,जि.नाशिक येथे आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी ॲड. किरण क्षत्रिय -प्राध्यापक लॉ कॉलेज, नाशिक यांनी नागरी कर्तव्य व शिष्टाचार याविषयावर प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले , तसेच या कार्यक्रमास त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.खुर्दळ, माजी विद्यार्थी तथा हरसुलचे उद्योजक अशोक भोये, प्रादेशिक कार्यालय निरीक्षक मा.श्री.राठोड साहेब, श्री.सुर्यवंशी साहेब, आणि कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिक जिल्हा समन्वयक श्रीमती सुनीता राणी, आदि मान्यवर  उपस्थित होते.
     या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री. देशमुख साहेब होते. 
कार्यक्रमात संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांनी अतिशय सुंदर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे नाट्यमय सादरीकरण केले. मान्यवरांच्या हस्ते तंत्र प्रदर्शन विजेते तसेच क्रिडा व इतर स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. नंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. जाधव सरांनी केले तर सूत्रसंचलन श्रीमती.अर्चना मोरे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने