महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दिंडोरी तालुक्यातील 17 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर

दिंडोरी । मनोज पाटील :- दिंडोरी तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींपैकी 9 ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. 
    दिंडोरी तालुक्यात दिंडोरी - पेठ उपविभागीय अधिकारी डॉ. आप्पासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी प्रशासकीय कार्यालयात तहसीलदार मुकेश कांबळे, नायब तहसिलदार श्रीमती दराडे यांच्या उपस्थितीत दिंडोरी तालुका ग्रामपंचायत 2025 - 2030 साठी सरपंच आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. 
या सरपंच आरक्षण सोडतीत दिंडोरी तालुक्यातील बिगर अनुसुचित क्षेत्रातील 17 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्‍चित करण्यात आले आहे. लोखंडेवाडी (ना. मा. प्रवर्ग), वलखेड (सर्वसाधारण स्त्री), मातेरेवाडी (ना. मा. प्रवर्ग स्त्री), पाडे (सर्वसाधारण स्त्री), जऊळके वणी (अनुसूचित जाती), आंबेवणी (सर्वसाधारण), शिंदवड (सर्वसाधारण), परमोेरी (सर्वसाधारण स्त्री), तळेगाव वणी (सर्वसाधारण), सोनजांब (सर्वसाधारण स्त्री), म्हेळूस्के (सर्वसाधारण), बोपेगाव (ना. मा. प्रवर्ग स्त्री ), अवनखेड (सर्वसाधारण स्त्री), ओझरखेड (ना.मा.प्रवर्ग), तीसगाव (ना. मा. प्रवर्ग), खेडगाव (अनुसूचित जमाती स्त्री), लखमापूर (अनूसुचित जमाती) या प्रमाणे सरपंच पदाचे आरक्षण निश्‍चित झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने