महाराष्ट्र ट्रायबल न्युज

नुतन प्राथमिक विद्यामंदिर, रमाबाई आंबेडकर नगर, अंबड येथील विद्यालयात नागपंचमी कार्यक्रम उत्साहात साजरा

बाऱ्हे l नामदेव पाडवी :- निराधार स्वावलंबन समिती संचालित, नुतन प्राथमिक विद्यामंदिर, रमाबाई आंबेडकर नगर, अंबड येथील विद्यालयात नागपंचमी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
      नागपंचमी हा श्रावण महिन्यातील एक महत्वाचा हिंदू सण आहे, जो नागदेवतेच्या पूजेसाठी समर्पित असतो. २०२५ मध्ये नागपंचमी २९ जुलै, मंगळवारी आहे. या दिवशी, लोक नागांच्या प्रतीकात्मक चित्रांची किंवा मूर्तींची पूजा करतात आणि त्यांच्या संरक्षणासाठी प्रार्थना करतात. ही विद्यार्थ्यांना माहिती समजून सांगितले आणि खरोखरच वारुळाचे आणि नागदेवतेची विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पूजन करून वातावरण प्रेरणादाय निर्माण केले होते. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ जाधव, श्रीम. पाटील, सोनवणे यांनी विद्यार्थ्यांन कडून वारुळ बनवुन घेतले आणि श्रीम. शेलार, पवार, सानप यांनी वारुळाचे पुजन केले. श्रीम. जाधव यांनी नागपंचमीची विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच महिला शिक्षिका यांनी विद्यार्थिनी सोबत फुगडी खेळल्या. शिक्षक चौधरी यांनी विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवून हा कार्यक्रम चांगल्याप्रमाणे पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने